बोधकथा - जीवनाचे सत्य
एका नावेतून काही प्राध्यापक प्रवास करत होते. नाव पलिकडे जात असताना, एका प्राध्यापकाने नावाड्याला विचारले, काय रे तुला गणित येतं का?
नावाडी म्हणाला, गणित? माझा आणि गणिताचा काय संबंध?
यावर तो प्राध्यापक म्हणाला, गणित येत नाही? मग तुझं २५ टक्के आयुष्य वाया गेलं आणि थोडा वेळ गेल्यावर त्याच प्राध्यापकाने विचारले, तुला ज्योतिष तरी कळतं का?
नावाड्याने नकारार्थी मान हलवून म्हणाला, नाही साहेब.
प्राध्यापक म्हणाला, काय रे? तुला गणित येत नाही. ज्योतिष कळत नाही. तुझं ५० टक्के आयुष्य वाया गेलं.
अचानक वादळं आलं. सोसाट्याचा वारा सुटला. नाव हेलकावे खावु लागला. सगळे घाबरून गेले. यावेळी नावाडी त्यांना म्हणाला, तुम्हाला पोहायला येतं? प्राध्यापक म्हणाला, नाही. मग नावाड्याने उडी मारली आणि म्हणाला तुमचं शंभर टक्के आयुष्य वाया गेलं. मला पोहता येतं. जे व्यवहारात कामाचे नाही, ते तुम्हाला येतं; पण मला जीवनात उपयोगी असणाऱ्या कला येतात. हेच जीवनाचे सत्य आहे.
( तात्पर्य : जीवनाचे सत्य साध्या साध्या व्यवहारातून कळते. )
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق