बोधकथा - ज्ञान
काही गाढवांचे व्यापारी गाढवे घेऊन प्रवास करीत होते. एका झाडाखाली त्यांचा मुक्काम पडला होता. गाढवे एकत्र केली होती. त्यांना बांधून घालण्यासाठी ते रस्सी शोधू लागले; पण ती सापडेना. अखेर त्यांनी एका गड्याला सांगितले, गाढवं एकत्र कर. हातात रस्सी आहे. असं समजून गाढवांना बांधून घातल्याचा अभिनय कर. त्याप्रमाणे गड्याने केले.
सकाळी उठल्यावर तो गाढवांना मारू लागला. गाढवे जागची हालेनात. मालकांनी त्याला विचारले, अरे तू त्यांना सोडलंस का? गडी म्हणाला, पण मालक बांधलं होत कधी? मालक म्हणाले, अरे तू रात्री बांधल्याचा जसा अभिनय केलास तसा आता सोडल्याचाअभिनय कर आणि मग बघ. गाढवं कशी जागची हालतात ते. गड्याने तसे केले आणि खरेच गाढवे लगेच जागची हलली.
माणसाची अवस्थाही अशीच आहे. आपण खरे मुक्त आहोत; पण मुक्तपणे जगत नाही. कारण प्रतिष्ठेच्या खोट्या बंधनाने आपण बद्ध आहोत.
(तात्पर्य : मुक्तपणे जगायचे असेल तर मनातून मुक्त व्हायला पाहिजे.)
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق