बोधकथा -आशेची शिदोरी
आशा.म्हणजे काळोखातही चमकणारा काजवाच. माणसाच्या एकाकीपणात तर त्याला हीच आशा सावलीसारखी सोबत करीत असते. संकटाच्या काळातही माणसाची आशा किंवा सकारात्मक भाव त्याला सोडत नाही.
अनेकदा आपल्याला तसा अनुभव येतो. माणूस जेव्हा एकाकी असतो, सगेसोयरेही त्याच्याकडे पाठ फिरवतात, तेव्हा मनातील आशाच त्याला धैर्य देत असते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर मॅक्मिलन हे उत्तर ध्रुवाच्या मोहिमेवर चालले होते. तेव्हा त्यांच्या नावे एक पाकीट आले. त्यावर लिहिले होते. तेव्हा त्यांच्या नावे एक पाकीट आले. त्यावर लिहिले होते. जिवंत राहण्याची उमेद नष्ट होईल तेव्हाच हे पाकीट उघडावं.
मॅमिलन यांनी ते पाकीट सोबत घेतले आणि ते उत्तर ध्रुवाची मोहीम करून सुखरुप परतही आले. त्या घटनेलाही पंचवीस-तीस वर्षे झाली. त्यांची मुलाखत घेणाऱ्याला त्यांनी हा प्रसंग सांगितला. तेव्हा मुलाखत घेणारा म्हणाला, अजूनही आपण ते पाकीट का उघडलं नाहीत? मॅमिलन म्हणाले. पहिली गोष्ट, ज्या व्यक्तीने मला हे पाठवलंय त्याचा विश्वास मी तोडू शकत नाही. आणि दुसरे म्हणजे मी कधीच आशा सोडलेली नाही.
तात्पर्य : ईश्वराच्या शोध मार्गात आशेशिवाय अन्य शिदोरी नाही
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق