निबंध - पाऊस | Essay - Rain
पाऊसपाऊस आल्यावर सर्वांनाच आनंद होतो.
पशू, पक्षी व माणसांना अन्न, पाणी मिळते.
झाडे, वेली टवटवीत होऊन आनंदाने डोलतात.
जमिनीतून हिरवेगार गवत वर येते.
विहिरी, ओढे-नाले, नदी यांना पाणी येते.
आपल्या शेतकऱ्यांचे जीवन तरी पूर्णपणे पावसावर अवलंबून असते.
पाऊस आल्यावर पेरणीव शेतीच्या कामाला वेग येतो.
पाउस पडला तरच शेतातील पिकांची वाढ होते .
पावसावरच सर्व लोकांचे जीवन अवलंबून असते .
सुतार, लोहार व बलुतेदारांची कामे चालू होतात.
पाऊस जर पडला नाही तर दुष्काळ पडतो
पाणी व अन्नासाठी जनावरे व माणसाचे हाल सुरु होतात.
झाडांची प्रचंड तोड झाल्याने निसर्ग व हवामानाचा समतोल बिघडला आहे.
प्रत्येक मानवाने व शेतकऱ्याने झाडे लावून जंगले वाढवली तरच भरपूर पाऊस पडेल.
सजीव सृष्टी पावसामुले नटून जाते .
पाऊस पडणे आपल्याच हाती आहे, असेच समजा!
Share yash
ردحذف