निबंध - गाय | Essay - Cow
गाय
गाय हा एक पाळीव प्राणी आहे .
गाय आपण सर्वांनीच पाहिली आहे.
गाईचे अनेक रंग व अनेक जाती असतात.
गवत, कडबा, भुसा व धान्य वगैरे गाईचे अन्न आहे.
गाय दूध देते.
गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात .
गाईच्या दूधापासून दही, ताक, लोणी, तूप बनवितात.
गाईचे दूध लहान बाळाच्या आईच्या दुधासारखे असते.
गाय फार उपयोगी व गरिब प्राणी आहे.
गाईपासून शेतीला बैल मिळतात.
हिंदू गाईला दैवत मानतात आणि तीची पूजा करतात.
देवगी, गीर, सिंधी, बेंगलोर या गाईच्या चांगल्या जाती आहेत.
संकरित गाई भरपूर दूध देतात.
प्रत्येक कुटुंबाने एक गाय सांभाळावी.
गाईचा सांभाळ चांगला करावा व भरपूर दूध मिळवावे.
दूध हे पूर्ण अन्न आहे. तसेच दूधापासून आर्थिक उत्पन्नही चांगले होते.
प्रत्येक कुटुंबाने एक तरी गाय पाळावी.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق