निबंध - माझी शाळा | Essay - My School
माझी शाळा मला फार आवडते.
मला शाळेत दररोज जायला आवडते .
माझ्या शाळेत वेगवेगले कार्यक्रम घेतले जातात .
गावाबाहेर उंच जागेत माझी शाळा आहे.
शाळेभोवती सुंदर सुंदर उंच झाडे आहेत.
शाळेच्या जवळच खेळाचे मैदान आहे.
आम्ही तेथे अनेक प्रकारचे खेळ दररोज खेळतो.
आम्ही शाळेत मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल असे विषय आणि कला, कार्यानुभव खेळ हे इतर विषयही शिकतो.
आमचे गुरुजी आम्हाला छान शिकवतात.
मराठी पुस्तकातील कविता आम्ही चालीवर म्हणतो.
रेडिओवरील कविता व पाठ आम्ही ऐकतो.
आता शाळेत टी.व्ही. सुद्धा आणलेला आहे.
त्यावर आम्ही अनेक प्रकारचे शालेय कार्यक्रम पाहतो.
शाळेच्या मागे व पुढे सुंदर बगीचा आहे.
बागेत सुंदर फुलझाडे व शोभेची झाडे, वेली आहेत.
आम्ही मुलांना सुरु, निलगिरी, पेरु, आंबा यांची झाडे लावली आहेत.
आम्ही आमच्या शाळेची व बागेची काळजी घेतो.
अशी माझी शाळा मला फार फार आवडते.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق