निबंध - दिवाळी | Essay - Diwali
दिवाळी
दिवाळी सर्वाचाच आनंदाचा सण आहे.
सर्व जण या सणाची आतुरतेने वाट पाहतात .
दिवाळीत रात्री ओळीने दिवे लावतात म्हणून दिपावळी किंवा दिवाळी म्हणतात.
दिवाळी पाच दिवस साजरी करतात.
दिवाळीत लाडू, करंज्या, अनारसे, चकल्या, चिवडा, वगैरे गोड व तिखट पदार्थ खूप करतात व
सर्वजण मिळून खातात.
मुलांसाठी फटाके, फुलबाज्या, नळे, चंद्रज्योती वगैरे आणतात.
दिव्यांनी प्रकाशाची आरास करतात. पाहुणे घरी येतात.
धनत्रयोदशी , नरक चतुर्दशी ,लक्ष्मीपूजन . बलिप्रतिपदा व भाऊबीज असे दिवस साजरे करतात .
भाऊबीजेला बहिण भावाला ओवाळते.
गरीब श्रीमंत सर्वांचे पाच दिवस आनंदात जातात.
यावेळी मुलांना शाळेला सुट्टी असते.
शेतकरी दिवाळीत गाई, म्हशींची पूजा करतात.
व्यापारी नवा हिशोब लिहितात.
सृष्टीची शोभा वाढलेली असते. थंडीला सुरुवात होते.
दिवाळी येते आणि सर्वांना आनंद देवून जाते.
असा हा दिवाळीचा सण सर्व लहान, थोर, गरिब, श्रीमंत साजरा करतात.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق