निबंध - माझी आई | Essay- My Mother
माझी आई
जर का मला कोणी प्रश्न विचारला, तुला आई जास्त आवडते की वडिल जास्त आवडतात?
तर मी त्यांना खणखणीत शब्दात उत्तर देईन, मला माझी आईच जास्त आवडते. कारण रक्ताचे दूध
करुन पाजणारी आई ही माझे सर्वस्व आहे म्हणून मला आई फार आवडते.
माझ्या आईसारखं कुणी नाही असं मला वाटत. माझी आई रोज पहाटे उठते.
पहाटे पासून सारखे घरकाम करते. आई कधी कामाचा कंटाळा करीत नाही.
वेळ काढून आम्हाला शिकवते. आईचे बोलणे, हसणे सारेच गोड आहे.
कधी कधी माझ्या आवडीचे पदार्थ करुन देते.
आम्ही मुले चांगली, स्वच्छ व अभ्यासू असावी म्हणून ती फार झटते.
आम्ही आजारी पडल्यावर ती झोपत सुद्धा नाही.
आमचे घर आईने स्वच्छ व सुंदर ठेवले आहे.
आई जवळ नसल्यावर मला करमत नाही.
आई दूरगावी गेल्यावर मला सारखी आठवण येते.
माझी आई मला फार फार आवडते.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق