योग्यता
आपल्याला राजा नाही म्हणून बेडकांना फार वाईट वाटत होते.त्यांनी देवापुढे जाऊन त्याबद्दल मत मांडले. हे अगदी गरीब प्राणी आहेत असे जाणून देवाने एक लाकडाचा ऑडका राजा म्हणून त्यांच्या डबक्यात टाकला. उबक्यातले पाणी एकदम जोराने वर उसळल्यामुळे सगळे बेडूक क्षणभर घाबरले आणि त्यांनी खोल पाण्यात बुड्या मारल्या; पण तो लाकडाचा ओंडका पाण्यात स्थिर राहिल्यामुळे ते सर्व धीर करुन धाडसाने पुन्हा वर आले. शेवटी त्यांना त्या ओंडक्याची बिलकुल भीती वाटेनाशी झाली आणि ते त्याच्यावरून उड्याही मारू लागले.
थोड्याच दिवसापूर्वी ज्याला घाबरून खोल पाण्यात बसले होते. आज या सगळ्यांनी त्याच्यावर उड्या मारून जणू राज्यच करू लागले. नंतर नंतर त्यांना त्या ओंडक्याची भीतीच वाटणे बंद झाले. मग असला साधा राजा असणं त्यांना कमीपणाचं वाटू लागलं. राजा कसा असावा, त्याला सगळ्यांनी घाबरून राहिले पाहिजे; पण हा राजा तर काही चालत नाही. बोलत नाही. न बोलणारा राजा तो कसला? मग सगळेजण पुन्हा देवाकडे गेले आणि दुसरा राजा देण्याबद्दल प्रार्थना करू लागले. हा पहिला राजा अंगदीच साधा आणि सुखासीन आहे असे त्यांचे म्हणणे होते. ते ऐकून देव त्यांच्यावर खूप रागावला आणि त्याने राजा म्हणून पाणसर्पच पाठविला. त्याने मात्र सापडतील तेवढे बेडूक गट्ट करण्यास प्रारंभ केला.
तात्पर्य : धोकेबाज हुकूमशहापेक्षा निरुपद्रवी आणि ऐदी राज्यकर्ता चांगला.
Kirti Baswanth mungade
ردحذفSUPER
ردحذف